Prime Minister Narendra Modi's
कोरोना देश राजकारण

पंतप्रधानांचा देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न, महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांच्याशी चर्चा…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशावासियांशी ‘मन की बात’ मधून संवाद साधला आणि देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न केला. देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटावर त्यांनी भाष्य केलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दलची मतं त्याचबरोबर लोकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली. ते म्हटले कि, कोरोना संयमाची परीक्षा घेत आहे. आपले अनेक सहकारी, नातेवाईक आपल्याला सोडून गेले आहेत. हा धैर्य आणि संयमाचा क्षण आहे असे मोदी म्हटले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

त्याचबरोबर पंतप्रधानांनी देशातील विविध भागात कार्यरत असलेल्या पहिल्या फळीतील कोविड योद्ध्यांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी लोकांच्या मनातील काही शंका उपस्थित केल्या.

डॉ. शशांक जोशी यांच्याशी बोलताना पंतप्रधान म्हणाले, तुमच्या विचारातील स्पष्टता मला आवडली. आपण सध्या दिवसरात्र काम करत आहात. आपण लोकांना दुसऱ्या लाटेबद्दल सांगावं. कोरोनाची दुसरी लाट कशी वेगळी आहे आणि काय काळजी घ्यायला हवी? असा प्रश्न मोदींनी केला. त्याला उत्तर देताना शशांक जोशी म्हणाले, “दुसरी लाट खूप वेगानं आली आहे. पहिल्या लाटेपेक्षा यावेळी विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त आहे. चांगली बाब ही आहे की, रिकव्हरी रेट आहे आणि मृत्यूदर खूप कमी आहे. यावेळी कोरोनाचा संसर्ग तरुणांमध्ये आणि मुलांमध्येही दिसून येत आहे. लक्षणांमध्ये आणखी भर पडली आहे. लोक घाबरलेले आहेत. पण, घाबरण्याची गरज नाही. ८० टक्के लोकांना लक्षणेच नाहीत. म्युटेशनमुळे घाबरून जाण्याची गरज नाही.”

त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी दुसरा प्रश्न विचारला. ‘मला अनेक पत्र मिळाली आहेत. उपचारांविषयी लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. काही औषधांची मागणीही खूप होतेय. त्यामुळे कोरोनाच्या उपचाराविषयीही आपण लोकांना माहिती द्यावी.’ त्यावर जोशी म्हणाले,”कोरोनाचा उपचार लोक खूप उशिराने सुरू करतात. आजार अंगावर काढतात. त्याचबरोबर मोबाईलवर येणाऱ्या माहितीवर लोक विश्वास ठेवतात. लोकांनी सरकारच्या सूचनांचं पालन केलं, तर कठिण परिस्थितीला तोंड देण्याची वेळ येत नाही. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी तीन प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. हलका, मध्यम आणि तीव्र कोरोना … हलका स्वरूपातील लक्षणं असलेल्यांनी ताप आणि ऑक्सिजनची पातळी तपासण्याबरोबरच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मध्यम व तीव्र कोरोना असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. स्वस्तातील औषधं उपलब्ध आहेत. मात्र, सध्या चाचण्यांमध्ये असलेल्या रेमडेसिवीरची चर्चा होत आहे. यामुळे एक गोष्ट होते की रुग्णाला रुग्णालयात दोन तीन दिवस कमी राहावं लागतं. तब्येत सुधारण्यास मदत होते. पण, सुरूवातीच्या दिवसांमध्ये हे औषध दिल्यानंतर रुग्णाची प्रकृती सुधरण्यास मदत होते. लोकांनी व्हॉट्सअपवरील माहितीवर विश्वासू ठेवू नये. लोकांवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जात आहेत. महागड्या औषधांमागे लागण्यात काही अर्थ नाही. काही भ्रम लोकांमध्ये तयार झालेले आहेत,” असं शशांक म्हणाले. या माहितीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात काही महत्वाचे मुद्दे :

  1. अफवांवर विश्वास ठेवू नका
    केंद्र सरकारकडून सर्व राज्यसरकारांना विनामूल्य लस पुरवण्यात आली आहे, जिचा लाभ 45 वर्षांवरील सर्व लोक घेऊ शकतात. आता 1 मे पासून देशात 18 वर्षांवरील प्रत्येकाला लस उपलब्ध होणार आहे, असं ते म्हणाले. केंद्र सरकार सर्व राज्यांना मोफत कोरोना लसी पाठवत आहे. कोणत्याही नागरिकानं कोरोना लसीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.
  2. मनोधैर्य उंचावलं होतं
    कोरोनाच्या पहिल्या लाटेवर यशस्वीपणानं मात केल्यानंतर देशातील जनतेचे मनोधैर्य उंचावलेले होते. मात्र, दुसऱ्या लाटेने देशाला धक्का दिला. आपल्याला दुसऱ्या लाटेवर विजय मिळवायचा आहे. कोरोना संदर्भात तज्ञ, औषध उद्योग आणि ऑक्सिजन निर्मिती यावर बैठका घेत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
  3. कॉर्पोरेट क्षेत्राला आवाहन
    देशातील कॉर्पोरेट क्षेत्रानं कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी व्हावं आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन करतानाच केंद्र सरकार भविष्यामध्येही कोरोना लसीकरणाचा मोफत कार्यक्रम सुरु ठेवेल. राज्यांनी मोफत लसीकरणाचा कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
  4. रुग्णवाहिका चालकांचं मोठं योगदान
    यावेळी त्यांनी रुग्णवाहिका चालकांचंही कौतुक केलं. कोरोना विषाणू संसर्गाच्या विरोधातील लढ्यामध्ये रुग्णवाहिका चालकांचं मोठं योगदान आहे. माझ्या मनात त्यांच्याविषयी धन्यवादाची भावना आहे, असं ते म्हणाले.
  5. थेट तज्ज्ञांशी संवाद
    नागरिकांमध्ये कोणत्या प्रकारे कोरोनाची भीती निर्माण होऊ नये म्हणून मोदींनी थेट तज्ज्ञांना मन की बातमध्ये पाचारण केलं. तसेच त्यांना देशावासियांशी संवाद साधायला लावला. मुंबईतील लिलावती रुग्णालयाती प्रसिद्ध डॉक्टर शशांक जोशी, श्रीनगरचे डॉ. नाविद यांना जनतेशी संवाद साधायला संधी दिली. तसेच रुग्णवाहिका चालवणारे, कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या गृहिणींचाही देशवासियांशी संवाद साधून दिला.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत