IPL double header: Chennai-Bangalore match this afternoon, Delhi-Hyderabad match tonight
क्रीडा

IPL डबल हेडर : आज दुपारी चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यात सामना, तर रात्री दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात सामना

IPL २०२१ : आज होणाऱ्या डबल हेडर सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात दुपारी ३.३० वाजता सामना रंगणार आहे. मुंबई येथे होणारा हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. तर दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रात्री ७.३० वाजता सामना खेळला जाईल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

विराट कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरू संघाने हंगामात आतापर्यंतचे सर्व 4 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर सीएसकेने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. पॉईंट टेबलमध्ये आरसीबी अव्वल आहे, तर सीएसके नंबर -2 वर आहे. चेन्नई संघाने बंगळुरूवर नेहमीच वर्चस्व राखले आहे. आतापर्यंत दोघांमधील 27 सामन्यांमध्ये सीएसकेने 17 तर आरसीबीने केवळ 9 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिश्चित होता.

आज डबल हेडरच्या दुसर्‍या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल. या हंगामात चेन्नईत खेळला जाणारा हा शेवटचा सामना असेल. दिल्ली सध्या ४ पैकी ३ सामन्यांत विजय मिळवून 6 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर हैदराबादची टीम 4 सामन्यांमध्ये २ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.

मागील मोसमप्रमाणे दिल्लीची टीम या वेळी चांगल्या लयीत दिसत आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्लीने चेन्नई आणि मुंबई पंजाब या संघांचा पराभव केला आहे. मात्र राजस्थानकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

डेव्हिड वॉर्नरचे अवघा 1 षटकार मारताच आयपीएल कारकिर्दीत 200 षटकार पूर्ण होणार आहेत. याखेरीज त्याने आज अर्धशतक ठोकले तर स्पर्धेत त्याच्या नावे 50 अर्धशतक पूर्ण होतील. तसेच वॉर्नर टी -20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करण्यापासून अवघ्या 46 धावा दूर आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत