दिल्लीविरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात बंगळुरूच्या संघाने २० षटकात ७ बाद १५२ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर देवदत्त पडीकलने दमदार अर्धशतक केले तर शेवटच्या टप्प्यात एबी डीव्हिलियर्सने चांगली खेळी केली. एनरिक नॉर्येने ३ बळी घेत बंगळुरूच्या धावगतीला आवर घातला, देवदत्त पडीकलने ४१ चेंडूत ५० धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली. बंगळुरूचा संघ प्रथम फलंदाजी करताना जोशुआ फिलीप (१२) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर सलामीवीर देवदत्त पडीकल आणि विराट कोहली यांनी डाव सावरला. अश्विनच्या गोलंदाजीवर विराट झेलबाद झाला. IPLच्या १३ वर्षात पहिल्यांदाच अश्विनने विराट कोहलीला बाद केले. विराटचा बळी टिपण्यासाठी अश्विनला तब्बल १३ वर्षे, १९ डाव आणि १२५ चेंडू टाकावे लागले. विराटने २४ चेंडूत २९ धावा केल्या.
Innings Break!#DelhiCapitals restrict #RCB to a total of 152/7 on the board. #DC chase coming up shortly. Stay tuned!
Scorecard – https://t.co/k9MT7oc7yJ #Dream11IPL pic.twitter.com/8jUaaXExXY
— IndianPremierLeague (@IPL) November 2, 2020