दिल्ली विरुद्ध बेंगळुरू यांच्यात लढत सुरु. दिल्लीने नाणेफेक जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला, दिल्ली आणि बेंगळुरू ला प्ले ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे.
दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग ११मध्ये महत्त्वाचे बदल केले. दिल्लीच्या संघाने अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल आणि डॅनियल सॅम्स या तिघांना संघात स्थान दिलं आहे. तर बंगळुरूच्या संघातून गुरूकीरत आणि नवदीप सैनीला वगळून शिवम दुबे आणि शाहबाज अहमदला संधी देण्यात आली आहे. दिल्ली आणि बेंगळुरू यांची ही अखेरची साखळी लढत आहे. गुणतक्त्यात दोघांचे समान १४ गुण आहेत. बेंगळुरूचे नेट रनरेट अधिक असल्याने ते दुसऱ्या तर दिल्ली तिसऱ्या स्थानावर आहे.
#DelhiCapitals win the toss and elect to bowl first against #RCB #Dream11IPL pic.twitter.com/5qW3fCq8Xg
— IndianPremierLeague (@IPL) November 2, 2020
बातमी करेपर्यंत बेंगळुरूच्या १ विकेट गमावून 9 षटकांत ५६ धावा झाल्या होत्या.