ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला सलग दुसऱ्या वन-डे सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-० अशी विजयी आघाडी घेतली. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली. दुसऱ्या सामन्यात विराटने मयांक अग्रवालचा सहावा गोलंदाज म्हणून वापर केला.
सहावा गोलंदाज म्हणून मयांकचा वापर करण्याच्या विराटच्या निर्णयावर माजी भारतीय गोलंदाज डोड्डा गणेश यांनी टीका केली आहे. गणेश यांनी ट्विट करत म्हटलं कि, विराटचा हा निर्णय म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे. ते म्हणाले, “मयांकला मी १९ वर्षाखालील संघाकडून खेळत असताना पाहतो आहे. कर्नाटक मधल्या टीम मॅनेजमेंटने कधीही मयांकचा गोलंदाज म्हणून विचार केला नाही. मी त्याला फार क्वचितवेळा नेट्समध्ये गोलंदाजी करताना पाहिलं आहे, आणि तोच आज भारताचा सहावा गोलंदाज आहे.
I’ve seen Mayank Agarwal from his Karnataka U-19 days. Trust me, the Karnataka think tank never considered Mayank as a bowling option. I’ve hardly seen him even bowling in the nets. And now he’s the sixth bowling option for India in the ODIs #Crazy #DoddaMathu #AUSvIND
— ದೊಡ್ಡ ಗಣೇಶ್ | Dodda Ganesh (@doddaganesha) November 29, 2020




