इंडियन प्रीमियर लीग ही भारतातील एक अत्यंत लोकप्रिय क्रीडा स्पर्धा मानली जाते. जेव्हा जेव्हा आयपीएलचा हंगाम येतो तेव्हा तेव्हा चाहते नवीन रेकॉर्डचा अनुभव घेण्यासाठी त्यांच्या टीव्ही स्क्रीनसमोर बसून राहतात आणि दुसरीकडे यातून क्रिकेटमध्ये नवीन स्टार खेळाडू उदयास येतात. आयपीएलमध्ये टी-२० स्वरूपाच्या या खेळात अनेक विक्रम झाले आणि ते मोडताने देखील आपण पाहिले आहेत. 23 एप्रिल २०१३ रोजी दोन मोठे रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत. आजही ते कायम आहेत.
आयपीएलच्या इतिहासात कोणत्या संघाने सर्वाधिक धावा केल्या आहेत?
आयपीएलमध्ये 23 एप्रिल 2013 रोजी बेंगळुरू येथे आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा नोंदविण्यात आल्या. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सहारा पुणे वॉरियर्स यांच्यात हा सामना झाला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 263/5 धावांची नोंद केली आणि आयपीएलमधील सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदविला. या सामन्यात ख्रिस गेल याने 66 चेंडूंत नाबाद १७५ धावा केल्या. ख्रिस गेलने १३ फोर आणि १७ सिक्स लगावले होते. त्यात त्याचा स्ट्राइक रेट 265.15 होता. सहारा पुणे वॉरियर्सने २० षटकांत केवळ १33 धावा केल्या होत्या. ख्रिस गेल १७५ धावाकरत सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदवला.
This score came in 2013 and is also the highest total ever posted by any team in the history of IPL. #PlayBold #KnowYourBold pic.twitter.com/JhM4nfPzYS
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) November 20, 2018
आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा पाठलाग?
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग IPL २०२० मध्ये झाला होता. IPL २०२० चा 9 वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 27 सप्टेंबर 2020 रोजी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झाला होता. यात पंजाब किंग्जने 223 धावांची नोंद केली. मयंक अग्रवालने 50 चेंडूत 106 धावांचे शानदार शतक झळकावले.
?RECORD ALERT?
We chase 224, the highest successful chase in #IPL history!! ??
P.S. We beat our own record. ?#RRvKXIP | #HallaBol | #RoyalsFamily
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 27, 2020
त्या बदल्यात राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी करत ३ चेंडू शिल्लक असतानाच टार्गेट पूर्ण करून सामना जिंकला. त्यात संजू सॅमसन आणि स्टीव्ह स्मिथने प्रत्येकी 85 धावा आणि 50 धावा केल्या. राहुल तेवतियाने 31 चेंडूत 53 धावा करून डाव पुढे नेला तर जोफ्रा आर्चरने राजस्थान रॉयल्सकडून दोन षटकार ठोकत खेळ संपविला. संजू सॅमसनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.




