IPL 2020 Second Qualifier: Delhi vs Hyderabad
क्रीडा

IPL 2020 दुसरा क्वालिफायर : आज दिल्ली कॅपिटल आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना

आयपीएलच्या १3 व्या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना आज दिल्ली कॅपिटल आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात ७.३० वाजता अबुधाबी येथे खेळला जाईल. या सामन्यातील विजयी संघ 10 नोव्हेंबरला दुबईमध्ये मुंबई इंडियन्स बरोबर अंतिम सामना खेळेल. हा सामना जिंकून दिल्लीला त्यांचा पहिला फायनल सामना खेळण्याची संधी मिळेल. आकडेवारीकडे बघितले तर हैदराबाद मजबूत स्थितीत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

लीग फेरीत हैदराबाद संघ दिल्ली संघावर दोन्ही सामन्यांमध्ये भारी ठरला होता. मोसमातील 11 व्या सामन्यात हैदराबादने दिल्लीला 15 धावांनी पराभूत केले. तर 47 व्या सामन्यात हैदराबादने दिल्लीला 88 धावांनी पराभूत केले.

लीग फेरीत दिल्ली 16 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये दुसर्‍या स्थानावर होती. त्याचबरोबर हैदराबादची टीम 14 गुणांसह तिसर्‍या स्थानावर होती.

लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादचा सक्सेस रेट 54.06% आहे. हैदराबादने आतापर्यंत एकूण 123 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 66 सामने जिंकले आहेत आणि 57 गमावले आहेत. दिल्लीचा सक्सेस रेट 44.47% आहे. दिल्लीने आतापर्यंत एकूण 192 सामने खेळले आहेत, त्यामध्ये 83 विजय आणि 106 गमावले आहेत. 2 सामने अनिश्चित होते.

अबू धाबीमधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकेल. येथे स्लो विकेटमुळे स्पिनर्सनाही खूप मदत होईल. नाणेफेक जिंकणार्‍या संघाला प्रथम गोलंदाजी करायला आवडेल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत