BCCI's decision regarding IPL

IPL बाबत BCCI चा निर्णय, IPL २०२२ पासून होणार मोठा बदल

क्रीडा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ची वार्षिक सर्व साधारण सभा अहमदाबाद येथे होत आहे. या बैठकीत IPL मधील संघांची संख्या वाढवण्यासंदर्भात एक मोठा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबतची मंजूरी देण्यात आली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बीसीसीआयच्या ८९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आयपीएलमध्ये २०२२ ( IPL 2022) पासून ८ ऐवजी १० संघ खेळतील असा निर्णय घेण्यात आला. आयपीएलमध्ये सध्या मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असे आठ संघ आहेत. २०२१ च्या आयपीएलमध्ये हे आठ संघ कायम असतील. पण त्यानंतर म्हणजे २०२२ च्या हंगामात आठ ऐवजी १० संघांमध्ये आयपीएलचे सामने पाहायला मिळणार आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत