अबुधाबी : आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता १४ नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये जेतेपदासाठी लढत होणार आहे. मात्र, या सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंड संघातील विकेटकीपर आणि फलंदाज डेवन कॉन्वे याच्या हाताला फॅक्चर झाले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल लढतीत न्यूझीलंडने जबरदस्त विजय मिळवला. पण संघातील विकेटकीपर आणि फलंदाज डेवन कॉन्वे हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यातून बाहेर झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायलनमध्ये विकेट गमावल्यानंतर कॉन्वेने रागाच्या भरात बॅटवर हात मारला. यामुळे त्याच्या हाताला फॅक्चर झाले आहे. सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंड इंग्लंडने दिलेल्या १६७ धावांचा पाठलाग करत होता. १४व्या षटकात कॉन्वे बाद झाला. तेव्हा न्यूझीलंडला ३८ चेंडूत ७२ धावांची गरज होती. लियाम लिव्हिंगस्टेनचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न करताना तो स्टंप आउट झाला. त्यानंतर रागाच्या भरात त्याने हात बॅटवर मारला. त्यामुळे १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत दौऱ्यात देखील तो खेळू शकणार नाही.
Devon Conway is out of the final because he smashed his hand onto his bat out of frustration ?? I’m sorry but oh my god, poor bloke #T20WorldCup pic.twitter.com/L3Z0SuqjV5
— A/S ? (@slicesofIife) November 11, 2021
न्यूझीलंड क्रिकेट संघाने दिलेल्या माहितीनुसार डेवन कॉन्वे हा टी-२० वर्ल्डकप आणि भारत दौऱ्यातून बाहेर झाला आहे. त्याचा उजवा हात मोडला आहे. कॉन्वेला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हातावर दुखापत झाली होती. न्यूझीलंड क्रिकेटने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात मुख्य कोच गॅरी स्टीड यांनी म्हटले आहे की, कॉन्वे फार दुखी आहे. आपण संघाची आशा तोडली अशी त्याची भावना आहे. आम्ही देखील त्याला मिस करू.
Devon Conway has been ruled out of the @T20WorldCup Final and following tour to India with a broken right hand. Conway sustained the injury when he struck his bat immediately after being dismissed in last night’s semi-final. More Info | https://t.co/LCMOTJqmqc #T20WorldCup pic.twitter.com/JIm9o6Rhxe
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 11, 2021




