worlds fastest runner usain bolt

जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टची करोना चाचणी पॉझिटिव्ह

क्रीडा ग्लोबल

जगातील सर्वात वेगाने धावणारा धावपटू उसेन बोल्ट याची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बोल्टला करोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. तरी त्याने स्वत:ला आयसोलेट केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गेल्या आठवड्यात बोल्टने त्याचा ३४वा वाढदिवस जल्लोषात साजरा केला होता. या वाढदिवसाच्या पार्टीत त्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. पार्टीत मास्कचा वापर केला गेला नव्हता. शनिवारी त्याचा वाढदिवस झाल्यानंतर त्याची करोनाची चाचणी घेण्यात आली होती. सोमवारी बोल्टने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यात तो करोना चाचणीच्या रिपोर्टची वाट पाहत असल्याचे म्हटले होते.

जमैकाच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी रात्री उशिरा जाहीर केले की, उसेन बोल्टला करोनाची लागण झाली आहे.

बोल्टने १०० मीटर आणि २०० मीटरमध्ये सलग ३ ऑलिंपिक स्पर्धेत (२००८, २०१२ आणि २०१६) सुवर्ण पदक जिंकले होते. जगातील सर्वात वेगाने धावणारा आणि आठ वेळा ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेता म्हणून उसेन बोल्टची ख्याती आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत