Nagpur Municipal Commissioner Tukaram Mundhe

नागपूर महापिलाका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण

कोरोना नागपूर

नागपूर महापिलाका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे ही  माहिती दिली आहे. मला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही नियम आणि अटींप्रमामे मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मागील १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करावी अशी विनंती आहे. तसेच नागपूरमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मी घरुन काम करणार आहे. आपण लवकरच ही लढाई जिंकू, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि या रुग्णांची कोणतीही लुटमार होऊ नये, यासाठी नागपूर महानगरपालिकेत तुकाराम मुंढे यांनी विशेष पथकाचं गठन केलं आहे. नागपुरातील खासगी रुग्णालयांवर लक्ष ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत