mahavikasaghadhi government maharashtra

निधी वाटपावरून काँग्रेसकडून राष्ट्रवादीवर पक्षपाताचा आरोप, शिवसेनेने झटकले हात

महाराष्ट्र राजकारण

विकास निधीचे समान वितरण होत नसून विकास निधीवर राष्ट्रवादीने डल्ला मारला, असं काँग्रेस आमदारांचं म्हणणं आहे. त्याविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा काँग्रेसच्या ११ आमदारांनी दिला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेस आमदारांच्या या भूमिकेचा समाचार घेण्यात आला आहे. ‘काँग्रेसचे आमदार उपोषणाला बसणार असतील तर तो काँग्रेसचा प्रश्न आहे. त्यांच्या या भूमिकेमुळं विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळणार आहे. शिवाय, काँगेस नेतृत्वासमोरील अडचण वाढणार आहे, ही जाणीव शिवसेनेनं काँग्रेसच्या आमदारांना करून दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

विकास निधी वाटपाच्या असमतोलाच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा देणाऱ्या काँग्रेस आमदारांना शिवसेनेनं स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. काँग्रेसचे आमदार आपल्याच सरकारविरोधात उपोषणाला बसणार असतील तर ज्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास परवानगी दिली त्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावरच अविश्वास व्यक्त केल्यासारखे होईल,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे. तसंच, काँग्रेस जर राष्ट्रवादीवर पक्षपाताचा आरोप करत असेल तर अर्थमंत्री अजित पवार त्यावर उत्तर देतील, असं म्हणत शिवसेनेनं या वादापासून हात झटकले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत