मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सामना, मुंबईने या सामन्यात आपला कर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली आहे. रोहित शर्माच्या जागेवर मुंबईने सौरभ तिवारीला संघात स्थान दिलं असून कायरन पोलार्ड मुंबईच्या संघाचं नेतृत्व करत आहे. रोहितसारख्या खेळाडूचं दुखापतग्रस्त होणं मुंबई इंडियन्सला परवडणारं नाही.
मुंबई इंडियन्सने रोहितला झालेल्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. पंजाबविरुद्ध सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर गेल्या ४ दिवसांमध्ये त्याच्या तब्येतीत सुधारणा आहे. बीसीसीआयसोबत चर्चा करून टीम मॅनेजमेंटने रोहितला चेन्नईविरुद्ध सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
? Official statement on Rohit Sharma ?#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL #CSKvMIhttps://t.co/nCHZI9s76l
— Mumbai Indians (@mipaltan) October 23, 2020




