KL Rahul Closes Critics With Special Celebration After Century

राहुलने शतक पूर्ण केल्यानंतर ‘खास’ शैलीत केली टीकाकारांची बोलती बंद, बघा व्हिडीओ…

क्रीडा

Ind vs Eng 2nd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. केएल राहुलने मालिकेच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले आणि आज दुसर्‍या सामन्यात दमदार शतक ठोकले. राहुलने इंग्लंडविरुद्ध सात चौकार आणि दोन षटकारांसह 108 धावा केल्या. 114 चेंडूत राहुलने आपले शतक पूर्ण केले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

इंग्लंडविरुद्धच्या टी -20 मालिकेत राहुलला खराब फॉर्मबद्दल बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला होता. शतक पूर्ण झाल्यानंतर राहुलने सर्व टीकाकारांना विशेष शैलीत शांत केले. राहुलने दोन्ही कानांवर हात ठेवला, याचा अर्थ तो बाहेरील टीकेकडे लक्ष देत नाही. अशाप्रकारे, राहुलने आपल्या फलंदाजीने टीकाकारांची बोलती बंद केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

सामन्यात राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्या विकेट पडल्या तेव्हा भारताच्या केवळ 37 धावा झाल्या होत्या. यानंतर राहुलने कर्णधार विराट कोहली आणि त्यानंतर ऋषभ पंत या दोघांबरोबर शतकी भागीदारी करत टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत