आयडीबीआय बँकेच्या एकूण १३४ रिक्त जागांसाठी ही भरती होत असून यामध्ये विविध पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज दाखल करु शकतात. डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.
या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील माहितीसाठी आयडीबीआय बँकेच्या idbibank.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात – २४ डिसेंबर २०२०
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ जानेवारी २०२१
कुठल्या पदाच्या किती जागांसाठी भरती ?
-
- डेप्युटी जनरल मॅनेजर – ११
- असिस्टंट जनरल मॅनेजर – ५२
- मॅनेजर – ६२
- असिस्टंट मॅनेजर – ९
शैक्षणिक पात्रता – एकूण १३४ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत असून या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पोस्टनुसार वेगवेगळी आहे. कुठल्या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी idbibank.in/careers या लिंकवर क्लिक करुन संपूर्ण जाहिरात पाहा.
महत्वाच्या सूचना :
- या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवार केवळ एका पदासाठीच अर्ज करु शकतो.
- अर्ज नोंदणीची प्रक्रिया तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा फी ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी जमा करण्यात येईल.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आपली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतरही पात्रता पूर्ण केल्याचे सुनिश्चित करावे.
- उमेदवार भारतातील कुठल्याही शाखेत काम करण्यास इच्छुक असणाऱ्याने आपला अर्ज सादर करावा.