विवोचा नवीन स्मार्टफोन Vivo V20 SE भारतात लाँच करण्यात आला आहे. हा फोन ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत येतो. फोनला दोन रंगात अॅक्वा मरीन ग्रीन आणि ग्रॅविटी ब्लॅक मध्ये लाँच करण्यात आले आहे. कंपनीने या फोनची किंमत २० हजार ९९० रुपये ठेवली आहे. या फोनचा सेल ३ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे.
Vivo V20 SE चे स्पेसिफिकेशन्स :
- 1080×2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले
- ड्यूल सिम सपोर्ट
- ८ जीबी रॅमच्या या फोनमध्ये क्वॉलकॉ स्नॅपड्रॅगन 665 SoC प्रोसेसर दिला आहे. फोनची इंटरनल मेमरी १२८ जीबी आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येवू शकते.
- फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा बोको लेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
- फोनला पॉवर देण्यासाठी यात 4,100mAh बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.
- या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे.
- फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, एफएम रेडियो आणि यूएसबी टाइप-C पोर्ट यासारखे ऑप्शन दिले आहेत.