नोकियाच्या पहिल्या लॅपटॉपची बाजारात एन्ट्री झाला आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आज Nokia PureBook X14 लॅपटॉप लॉन्च करण्याची घोषणा केली. या लॅपटॉपची किंमत 59,990 रुपये आहे. Nokia PureBook X14 लॅपटॉप चे प्री-बुकिंग 18 डिसेंबरपासून सुरू होईल.
Nokia PureBook X14 चे स्पेसिफिकेशन्स :
- Nokia PureBook X14 लॅपटॉप चे वजन 1.1 किलो आहे. हा लॅपटॉप केवळ 16.8 मिमी जाडीचा आहे.
- या लॅपटॉपमध्ये पॉवरफुल साऊंडसाठी डॉल्बी ऑडिओ सपोर्ट देण्यात आला आहे.
- चांगल्या ग्राफिक्ससाठी, या लॅपटॉपमध्ये आपल्याला 1.1 Ghz टर्बो GPU सह इंटीग्रेटेड इंटेल UHD 620 ग्राफिक्स कार्ड मिळेल.
- हा लॅपटॉप 8 तास बॅटरी लाइफसह येतो. बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी यात 65 वॅटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलेला आहे.
- कनेक्टिव्हिटीसाठी, या लॅपटॉपमध्ये ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, यूएसबी 3.1, यूएसबी 2.0, सिंगल HDMI पोर्ट आणि एक RJ45 पोर्ट दिलेला आहे. लॅपटॉपमध्ये सिंगल ऑडिओ आउट पोर्ट आणि एक माइक पोर्ट देखील दिलेला आहे.
- ऍडिशनल वैशिष्ट्याबद्दल बोलायचं झालं तर यात विंडोज हॅलो फेस अनलॉकसह HD IR वेबकॅम, ऍडजस्टेबल बॅकलाइटसह कीबोर्ड आणि मल्टिपल जेश्चर ऑप्शन असणारा टचपॅड देखील मिळतो.