QR code alone is no longer enough for WhatsApp web login

मोठी बातमी : WhatsApp web च्या लॉगइनसाठी आता फक्त क्यूआर कोड पुरेसा नाही

तंत्रज्ञान

नवी दिल्ली : लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप मधील एका अपडेटनं सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. ही अपडेट अॅपच्या डेस्कटॉप लॉगइनच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. ही अपडेट WhatsApp Web च्या लॉगइनच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. आतापर्यंत यासाठी फक्त क्यूआर कोडचाच वापर करण्यात येत होता. परंतु आता युजर्सना डेस्कटॉपवर लॉगइन करतेवेळी क्यूआर कोडचा वापर करण्यापूर्वी फेस प्रिंट किंवा फिंगरप्रिंट अनलॉकचा वापर करावा लागणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कसं वापराल हे फिचर :

  1. WhatsApp web अथवा व्हॉट्यस अप डेस्कटॉपमध्ये अकाऊंट लिंग करण्यासाठी सर्वप्रथम WhatsApp सुरु करा.
  2. त्यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात दिलेल्या तीन ठिपके असणाऱ्या चिन्हावर क्लिक करुन सेटींग्ज मध्ये जा.
  3. त्यामध्ये व्हॉट्सअप वेब अथवा डेस्कटॉपवर क्लिक करा.
  4. Link a Device या पर्यायावर क्लिक करा.
  5. यानंतर फोनच्या बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनला फॉलो करा.

लक्षात ठेवा : तुम्ही क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर जर तुमचं अकाऊंट दुसऱ्या कोणत्या ठिकाणाहून लॉगइन दिसलं तर ते तातडीनं लॉगआऊट करा.

येत्या काही दिवसांमध्ये WhatsApp युजर्सना मल्टी डिवाइस लॉगइन फीचरही मिळण्याची चिन्हं आहेत. येत्या काळात युजर्स एकाच वेळी अनेक डेस्कटॉपवर एकच WhatsApp अकाउंट सुरु करु शकतात. सध्या मात्र एकाच डिवाइसवर लॉगइन करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत