Amazon's troubles escalate, ED launches probe against Amazon

अॅमेझॉनच्या अडचणीत वाढ, दिल्ली उच्च न्यायालयाच्या टिपण्णीनंतर आता ED चा अॅमेझॉन विरोधात तपास सुरु

देश

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या विरोधात तपास सुरु केला आहे. हा तपास फॉरेन एक्सचेन्ज मॅनेजमेन्ट अॅक्टच्या (FEMA) उल्लंघन प्रकरणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेमा कायद्याच्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अॅमेझॉनच्या विरोधात ईडीने तपास सुरु केला आहे. या कारवाईचे निर्देश वाणिज्य मंत्रालयाकडून ईडीला देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अॅमेझॉनच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या आधी दिल्ली उच्च न्यायालयानेही अॅमेझॉन विरोधात टिपण्णी केली होती. अॅमेझॉनने रिलायन्स समूह आणि फ्यूचर रिटेल ग्रुपमध्ये झालेल्या कराराला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. गेल्या महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाने यावर सुनावणी करताना म्हटलं होतं की काही तडजोडींच्या माध्यमातून फ्यूचर रिटेल ग्रुपवर अॅमेझॉन आपले अप्रत्यक्ष स्वरुपात नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे फेमा आणि प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक कायद्याचं (FDI) उल्लंघन समजले जाईल.

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाची टिपण्णी आणि वाणिज्य मंत्रालयाचे निर्देश आल्यानंतर ईडीने अॅमेझॉन विरोधात तपास सुरु केला आहे. लवकरच अॅमेझॉनकडून याप्रकरणी सविस्तर माहिती मागवण्यात येण्याची शक्यता आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत