baby
देश

महिलेने नवजात बाळाला मुख्यमंत्री निवासस्थानाजवळ बेवारस सोडलं, रक्ताच्या ठशांवरून महिलेचा शोध

हिमाचल प्रदेश : एका महिलेने आपल्या नवजात बाळाला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर बेवारस अवस्थेत सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या सरकारी निवासस्थानाजवळ हे नवजात बाळ सुरक्षा रक्षकांना आढळलं. त्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर काही तासांतच हे बाळ एका अविवाहीत महिलेचं असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या शनिवारी महिलेने कमला नेहरू रुग्णालयाजवळ (KNH) आपल्या नवजात बाळाला बेवारस अवस्थेत सोडून दिलं होतं. हे ठिकाण मुख्यमंत्री निवासस्थानाच्या जवळ असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या काही सुरक्षारक्षकांनी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बाळाला ताब्यात घेत उपचारासाठी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले. बाळाची प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यानंतर रस्त्यावर सापडलेल्या रक्ताच्या ठशांवरून पोलीस या महिलेपर्यंत पोहचले आणि पोलिसांनी तिच्या घरी जाऊन तिला ताब्यात घेतले.

चौकशी अधिकारी रंजना शर्मा यांनी सांगितले की संबंधित महिलेला केएनएच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर तिला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या महिलेविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३१७ (१२ वर्षांहून कमी वयाच्या बाळाचा परित्याग करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत