What exactly is Rahul Gandhi studying in Bangkok?

राहुल गांधी बँकॉकमध्ये जाऊन नक्की कोणत्या शेतीचा अभ्यास करत आहेत?

देश

मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सलग सातव्या दिवशी शेतकऱ्यांची आंदोलनं सुरु असून दिल्लीत शेतकरी मोदीसरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत. हरयाणा आणि पंजाबमधील शेतकरी या कायद्यांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मंगळवारी सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, पीयूष गोयल आणि सोम प्रकाश यांनी शेतकरी नेत्यांशी बैठकीत संवाद साधला. पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते पंतप्रधान मोदींवर टीका करत असतानाच भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधीवर घणाघाती टीका केली. काँग्रेसचे प्रवक्ते अखिलेश सिंग यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. “शेतकरी वर्ग दिल्लीला आंदोलन करत आहे. कडाक्याच्या थंडीत ते आपल्या मागण्यांसाठी निदर्शनं करत आहेत. आणि पंतप्रधान मोदी मात्र तिकडे काशीमध्ये संगीताचा आनंद घेत मान डोलवत आहेत!”, असे ते म्हणाले.

भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी या टीकेवर उत्तर देताना थेट राहुल गांधींवरच निशाणा साधला. “मोदीजी किमान काशीलाच गेले आहेत. मोदीजी बनारसला गेले तर विरोधकांना लगेच राग येतो. मोदीजी राहुल गांधींसारखे बँकॉकमध्ये तर गेलेले नाहीत. राहुल गांधी तिकडे बँकॉकमध्ये जाऊन बसले आहेत. तिथे नक्की ते कोणत्या शेतीचा अभ्यास करत आहेत?”, अशा शब्दात संबित पात्रा यांनी राहुल गांधीवर टीका केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत