कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या ते दोघेही जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. परंतु ड्रग्ज प्रकरणात भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी एनसीबीने न्यायालयात केली आहे.
भारती आणि हर्षच्या घरात 86.5 ग्रॅम गांजा जप्त केल्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी त्या दोघांनाही अटक करण्यात आली होती. यानंतर प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर दंडाधिकारी न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर केला होता. भारती आणि हर्षचा जामीन रद्द करण्यात यावा तसेच त्यांना चौकशीसाठी एनसीबीच्या ताब्यात सोपवण्यात यावे, अशी मागणी देखील केली आहे. न्यायालयाने मंगळवारी भारती आणि हर्षला या संदर्भात नोटीस पाठवली असून, या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.