Swara Bhaskar clarifies her controversial post regarding the movie 'Chhava' and shares her reaction on the historical film based on Chhatrapati Sambhaji Maharaj.
देश मनोरंजन

मलाही आपल्या इतिहासाचा अभिमान, पण… छावा सिनेमाबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर स्वरा भास्करचे स्पष्टीकरण

मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ सिनेमा 14 फेब्रुवारीला रिलीज झाला. त्यानंतर या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. एका आठवड्यात सिनेमाने 300 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा सिनेमा पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. शंभूराजांनी बुऱ्हाणपूरची लूट केल्यानंतर औरंगजेब सूडाने पेटला आणि दिल्ली सोडून तो दक्षिणेत चाल करुन आला. त्यानंतर संभाजी महाराजांनी त्याला नऊ वर्ष झुंज दिली, असा सर्व ऐतिहासिक घटनाक्रम हा सिनेमात दाखवण्यात आलाय. दरम्यान, सिनेमाला सर्वांकडून तुफान प्रतिसाद मिळत असताना अभिनेत्री स्वरा भास्करने याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर संपूर्ण देशभरातून तिच्यावर टीकेची झोड उठली. अखेर स्वराने तिच्या वादग्रस्त पोस्टवर आज X या प्लॅटफॉर्मवरुन स्पष्टीकरण दिलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

स्वरा भास्कर म्हणाली कि, मी केलेल्या ट्वीटमुळे अनेक वादविवाद झाले आणि काही टाळता येण्याजोगे गैरसमज देखील निर्माण झाले आहेत. मी निःसंशयपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर वारशाचा आणि योगदानाचा आदर करते.. विशेषत: त्यांच्या सामाजिक न्याय आणि स्त्रीयांच्या सन्मानासाठी मांडलेल्या भूमिकांचाही मी आदर करते. माझा मुद्दा एवढाच आहे की, आपल्या इतिहासाचा गौरव करणे खूप छान आहे, पण कृपया सध्याच्या चुका आणि अपयश लपवण्यासाठी ऐतिहासिक वैभवाचा गैरवापर करू नका. इतिहास हा नेहमी लोकांना एकत्र आणण्यासाठी वापरला गेला पाहिजे. लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी आणि सध्याच्या समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी नाही. जर माझ्या आधीच्या ट्विटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल खेद आहे..
इतर कोणत्याही अभिमानी भारतीयाप्रमाणे मलाही आपल्या इतिहासाचा अभिमान आहे. आपल्या इतिहासाने आपल्याला एकत्र आणले पाहिजे आणि चांगल्या आणि अधिक समावेशक भविष्यासाठी लढण्यासाठी आपल्याला बळ दिले पाहिजे.

स्वरा भास्कर काय म्हणाली होती?
चेंगराचेंगरी होऊन लोकांचे भयावह मृत्यू झाले आहेत, पण ते सोडून चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून लोक भावूक होत असतील किंवा संताप व्यक्त करत असतील तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय. गैरव्यवस्थापनामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचे मृत्यू झाले आहेत. त्यांचे मृतदेह बुलडोझरद्वारे काढावे लागले. यावर चिंता न व्यक्त करता समाज 500 वर्षांपूर्वी घडलेला चित्रपटातील सीन पाहून भावूक होत आहे, संताप व्यक्त करत आहे, असं स्वरा भास्करने म्हटलं होतं.

500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असेल तर तो समाज मेंदूने आणि आत्म्याने मृत, स्वरा भास्करचे ‘छावा’ चित्रपटाबद्दल वादग्रस्त विधान

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत