Swara Bhaskar's tweet about Chhava movie, based on Chhatrapati Sambhaji Maharaj's life, sparks backlash on social media.
देश मनोरंजन

500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असेल तर तो समाज मेंदूने आणि आत्म्याने मृत, स्वरा भास्करचे ‘छावा’ चित्रपटाबद्दल वादग्रस्त विधान

मुंबई : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या छावा या सिनेमाला लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि त्यांचा मुघलांकडून झालेला अनन्वित छळ या सिनेमातून दाखवण्यात आला आहे. अनेकांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. दरम्यान, अभिनेत्री स्वरा भास्कर हिने या सिनेमाबाबत ट्वीटरवरुन आक्षेपार्ह पोस्ट केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

स्वरा भास्करने काय ट्विट केले?
स्वरा भास्करने तिच्या एक्स अकाउंटवर लिहिले आहे की, चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असेल किंवा संताप व्यक्त करत असेल आणि गैरव्यवस्थापनामुळे व चेंगराचेंगरी होऊन लोकांचे भयानक मृत्यू झाल्यानंतर मृतदेह बुलडोझरने काढण्यापेक्षा जास्त संताप चित्रपटातील सीन पाहून येत आहे, तर तो समाज मेंदूने आणि आत्म्याने मृत आहे.’

छावा हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील महाराज संभाजींच्या भूमिकेसाठी विकी कौशलची खूप प्रशंसा होत आहे. चित्रपटातील एका दृश्यात ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांकडून छळताना दाखवण्यात आले आहे, त्यावर प्रेक्षकांनी खूप भावनिक प्रतिक्रिया दिल्या. हे सर्व बघताना लोकांचे अश्रू थांबत नव्हते आणि त्यांना मुघलांची चीड येत होती. पण स्वरा भास्करने चित्रपटाबाबत अशी टिप्पणी केली, ज्यामुळे हे ट्विट व्हायरल झाले आणि लोकांचा राग शिगेला पोहोचला आहे. नेटकऱ्यांनी तिच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.

‘छावा’ हा सिनेमा लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला असून दिनेश विजन हे या सिनेमाचे निर्माते आहेत. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या सिनेमाला संपूर्ण भारतातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका निभावली आहे, तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारताना दिसत आहे. याशिवाय अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. हा सिनेमा शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत