fire rumour in punjab mail passengers jumped from moving train
देश

पंजाब मेल एक्स्प्रेसच्या बोगीला आग लागल्याची अफवा, प्रवाशांनी चालत्या रेल्वेतून मारल्या उड्या, २० पेक्षा जास्त प्रवासी जखमी

बिलपूर कटरा : पंजाब मेल एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी चक्क चालत्या रेल्वेतून उड्या मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी चेंगराचेंगरी झाल्याचीही माहिती आहे. या घटनेत २० हून अधिक प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ७ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. जखमी प्रवाशांना शाहजहांपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, गाडी क्रमांक १३००६ पंजाब मेल एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. ही एक्सप्रेस अमृतसरहून हावडाच्या दिशेने जात होती. ही गाडी सकाळी साडेआठच्या सुमारास बिलपूर कटरा स्टेशनवर पोहोचताच, गाडीच्या जनरल डब्यातून धुराचे लोट दिसू लागले. ते बघून गाडीच्या बोगीचा आग लागल्याची अफवा पसरली. यावेळी प्रवाशांनी घाबरून चालत्या रेल्वेतून उड्या मारल्या.

दरम्यान, यावेळी इतर बोगीत चेंगराचेंगरी झाल्याचंही बघायला मिळालं. या घटनेत एकूण २० पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले असून त्यापैकी ७ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच, रेल्वे प्रशासनाने एक्सप्रेस गाडी थांबवून तपासणी केली असता सर्व काही ठीक असल्याचं दिसून आलं. तसेच जखमी प्रवाशांना शाहजहांपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत