बिलपूर कटरा : पंजाब मेल एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी चक्क चालत्या रेल्वेतून उड्या मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी चेंगराचेंगरी झाल्याचीही माहिती आहे. या घटनेत २० हून अधिक प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ७ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. जखमी प्रवाशांना शाहजहांपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, […]

