अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वतःच सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. सोनूने म्हटले आहे कि, ‘आज सकाळी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. म्हणून मी स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे. काळजी करण्याची काहीच गरज नाही, उलट, आपल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आता माझ्याकडे पूर्वीपेक्षा जास्त वेळ असेल. लक्षात ठेवा, मी नेहमीच तुमच्याबरोबर आहे.’
— sonu sood (@SonuSood) April 17, 2021
गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये सोनूने लोकांना खूप मदत केली होती. आताही आपल्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तो देशभरातील लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असतो.




