नवी दिल्ली : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्येच्या बाबतीत भारतात वाढत जाणारे आकडे धडकी भरवणारे आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत २ लाख ३४ हजार ६९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर १ हजार ३४१ कोरोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले.
कोरोना संक्रमणाचा हाच वेग कायम राहिला तर भीषण परिस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. अहवालानुसार, १५ दिवसांत मृतांची संख्या तिप्पटीनं वाढली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ४५ लाख २६ हजार ६०९ वर पोहचली असून आतापर्यंत देशात एकूण १ लाख ७५ हजार ६४९ नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात १६ लाख ७९ हजार ७४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.




