Indian Air Force Recruitment 2021 Iaf Group C Vacancy
काम-धंदा देश

नोकरीची संधी : भारतीय वायुसेनेत ग्रुप-सी भरती, दहावी उत्तीर्णांपासून पदवीधरांसाठी संधी

Indian Air Force Group C Recruitment २०२१ : दहावी, बारावी किंवा पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांसाठी भारतीय वायु सेनेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. इंडियन एयरफोर्सने ग्रुप-सी च्या सिव्हिलिअन पोस्टसाठी बंपर भरती सुरू केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पदांचा तपशील :

  1. सीनियर कॉम्प्युटर ऑपरेटर – २ पदे
  2. स्टोर सुपरीटेंडेंट – ६६ पदे
  3. स्टेनोग्राफर ग्रेड 2 – ३९ पदे
  4. लोअर डिवीजन क्लर्क (LDC) – ५३ पदे
  5. हिन्दी टायपिस्ट – १२ पदे
  6. स्टोर कीपर – १५ पदे
  7. सिविलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायवर – ४९ पदे
  8. स्वयंपाकी – १२४ पदे
  9. पेंटर – २७ पदे
  10. कारपेंटर – ३१ पदे
  11. आया/ वॉर्ड सहायिका – २४ पदे
  12. सफाई कर्मचारी – ३४५ पदे
  13. धोबी – २४ पदे
  14. मेस स्टाफ – १९० पदे
  15. एमटीएस – ४०४ पदे
  16. वल्कनाइजर – ७ पद
  17. टेलर – ७ पदे
  18. टिनस्मिथ – १ पद
  19. कॉपर स्मिथ एंड शीट मेटल वर्कर – ३ पदे
  20. फायरमन – ४२ पदे
  21. फायर इंजन ड्रायवर – ४ पदे
  22. फिटर (मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट) – १२ पदे
  23. ट्रेड्समन मेट – २३ पदे
  24. लेदर वर्कर – २ पदे
  25. टर्नर – १ पद
  26. वायरलेस ऑपरेटर मेकॅनिक – १ पद

एकूण पदांची संख्या – १५०८

पात्रता :

पदांनुसार विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता अनिवार्य आहे. दहावी पास ते आयटीआय कोर्स करणारे किंवा बारावी उत्तीर्ण किंवा कोणत्याही विषयातील पदवीधर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. १८ ते २५ वर्षांपर्यंत तरुण (आरक्षित वर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत नियमानुसार सवलत मिळेल) अर्ज करू शकतात. कोणत्या पदासाठी काय योग्यता हवी, याची पूर्ण माहिती पुढे दिलेल्या नोटिफिकेशन लिंक वर क्लिक करून मिळू शकेल.

असा करा अर्ज :

भारतीय वायुसेनेच्या या भरतीसाठी (IAF Jobs) तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा आहे. दिलेले नोटिफिकेशन डाऊनलोड करा. त्यात अर्ज दिला आहे. त्याची प्रिंट घ्या आणि संपूर्ण माहिती भरा, नंतर आवश्यक त्या कागदपत्रांसही कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर पाठवा. संबंधित एयरफोर्स स्टेशन वर ९ मे २०२१ च्या पूर्वी पोहोचायला हवे.

नोटिफिकेशन लिंक :

http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_10801_20_2021b.pdf

निवड प्रक्रिया :

रिक्त पदांवर नियुक्तीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेच्या आधारे योग्य त्या उमेदवारांची निवड केली जाईल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत