Rape case ambulance driver rapes 19 year old corona positive girl in kerala
कोरोना देश

कोरोना पॉझिटिव्ह मुलीवर रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने केला बलात्कार

केरळ :  १९ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरनेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात नेण्यापूर्वी या ड्रायव्हरने कोरोना पॉझिटिव्ह मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एकीकडे कोरोना साथीच्या रोगामुळे लोक प्रचंड त्रस्त आहेत. त्याचदरम्यान ही घटना उघडकीस आल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे. केरळच्या पटनमिट्टा येथील एका मुलीला कोरनाची लागण झाली होती. त्यामुळे तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णवाहिका बोलविली आणि रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला मुलीला रुग्णालयात नेण्यास सांगितलं. यानंतर पीडित मुलीने अशी माहिती दिली की, रुग्णवाहिकेत आणखी एक रुग्ण होता. पण ड्रायव्हरने या रुग्णाला आधी उतरवलं आणि रुग्णवाहिका एका निर्जन स्थळी नेली. मुलीने असा आरोप केला आहे की, याच निर्जन स्थळी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिला कोविड केअर सेंटरमध्ये घेऊन गेला. तिथे मुलीला सोडल्यानंतर तो पळून गेला.

कोविड सेंटरमध्ये गेल्यानंतर मुलीने तिच्याबरोबर घडलेल्या घटनेविषयी डॉक्टरांना सांगितलं. त्यानंतर तिथे एकच खळबळ उडाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी देखील घटनेचं गांभीर्य ओळखून आरोपीचा कसून घेतला. त्यानंतर काही तासातच आरोपी चालकाला अटक देखील करण्यात आली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत