Jio Is Offering 10 Gb Data And Disney Hotstar Vip For Free
क्रीडा गॅझेट्स देश

गुड न्यूज! Jio फ्री देतेय १० जीबी डेटा आणि हॉटस्टारचे (Hotstar) फ्री सब्सक्रिप्शन.. जाणून घ्या

नवी दिल्लीः सध्या आयपीएलची क्रेझ प्रचंड वाढली आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या युजर्संसाठी जबरदस्त प्लान्स आणत आहेत. या दरम्यान रिलायन्स जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जिओ आपल्या ग्राहकांना २०२१ क्रिकेट सीजनचा आनंद साजरा करण्यासाठी, १० जीबी पर्यंत फ्री डेटा आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन ऑफर करीत आहे. ही ऑफर केवळ निवडक जिओ प्रीपेड प्लान्सवर लागू होणार आहे. टेलिकॉम ऑपरेटरने एक नवीन जिओ क्रिकेट अॅप सुद्धा लाँच केला आहे. जो सर्व JioPhone यूजर्ससाठी फ्री मध्ये उपलब्ध आहे. अॅप कंपनीच्या माहितीनुसार JioPhone यूजर्सला स्कोर अपडेट जाणून घेण्याासाठी क्विज मध्ये भाग घेण्यासाठी आणि बक्षीस जिंकण्यासाठी परवानगी देते. जाणून घ्या फ्रीमध्ये डेटा आणि हॉटस्टार ऑफरची सोपी पद्धत.

  1. जिओचा ४०१ रुपयांचा प्रीपेड प्लान
    जर तुम्हाला ४०१ रुपयांचा प्रीपेड प्लान खरेदी करायचा असेल तर तुम्हाला ३ जीबी डेली डेटा शिवाय, ६ जीबी डेटा फ्री मिळू शकेल. याचाच अर्थ तुम्हाला ९६ जीबी अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. युजर्संना जिओ नेटवर्क वर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज 100 SMS मिळते. याशिवाय, Jio डिज्नी + हॉटस्टार VIP (१ वर्ष), JioTV, JioCinema आणि दुसरे OTT अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
  2. जिओचा ५९८ रुपयांचा प्रीपेड प्लान
    जिओचा ५९८ रुपयांचा प्रीपेड प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळते. या प्लानसोबत एक्स्ट्रा डेटा मिळत नाही. परंतु, फ्री डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी १ वर्षापर्यंतचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
  3. जिओचा ७७७ रुपयांचा प्रीपेड प्लान
    या प्लानमध्ये एक्स्ट्रा ५ जीबी डेटा, डेली डेटा १.५ जीबी, अनलिमिटेड कॉलिंग, ८४ दिवसांसाठी एकूण १०० एसएमएस ऑफर केले जाते. कंपनी हॉटस्टार सब्सक्रिप्शन सुद्धा देत आहे. कस्टमर सर्व क्रिकेट सामने फ्रीमध्ये पाहू शकते.
  4. जिओचा २५९९ रुपयांचा प्लान
    जिओचा २५९९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान मध्ये १० जीबी डेटा फ्री मध्ये ऑफर केला जातो. या प्लानमध्ये २ जीबी डेली डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस याचा समावेश आहे. ही एक लाँग टाइम प्लान आहे. ३६५ दिवसांसाठी म्हणजेच १२ महिन्यांसाठी या प्लानची वैधता आहे. या प्लान सोबत डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी एक वर्षासाठी आणि अन्य जिओ अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत