Mumbai Indians and Sunrisers Hyderabad
क्रीडा

IPL 2021 : आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना

IPL २०२१ : आज IPL च्या 9 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद समोरासमोर असतील. चेन्नईच्या चेपक स्टेडियमवर रात्री ७.30 वाजता हा सामना सुरू होईल. या हंगामात हैदराबादच्या संघाला त्यांच्या दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे आजचा सामना जिंकून पहिला विजय मिळवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या मोसमात मुंबईने आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. RCB समोर मुंबई संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. तर केकेआर विरुद्ध सामना जिंकला. लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 16 सामने खेळले गेले आहेत. यापैकी दोन्ही संघांनी 8-8 सामने जिंकले आहेत.

चेपॅक स्टेडियमची खेळपट्टी स्पिनर्सला उपयुक्त ठरली आहे. फिरकीपटू येथे आश्चर्यकारक प्रदर्शन करू शकतील अशी अपेक्षा आहे. या खेळपट्टीवर मागील सामन्यात राहुल चहर आणि राशिद खान यांनी चांगली गोलंदाजी केली. या मैदानावर या मोसमात आतापर्यंत 4 सामने झाले आहेत. त्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ 3 सामने जिंकला आणि नंतर फलंदाजी करणार्‍या संघाने केवळ 1 सामना जिंकला. 14 व्या मोसमात या खेळपट्टीवर एकूण 62 विकेट पडल्या आहेत. त्यापैकी फिरकीपटूंनी 20 विकेट्स घेतल्या आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत