Price of Sputnik V vaccine imported from Russia to India announced
कोरोना ग्लोबल देश

DCGI कडून सीरम इंस्टीट्यूटला मिळाली स्पुटनिक-व्ही लस बनवण्याची परवानगी

पुणे : पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII)ला रशियाची स्पुटनिक-व्ही लस बनवण्याची परवानगी मिळाली आहे. लस परीक्षण आणि विश्लेषणासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून काही अटी-शर्तींसह शुक्रवारी सीरमला स्पुटविक-V लस बनवण्याची परवानगी मिळाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

याआधी सीरम इंस्टिट्यूटने पुण्यात असलेल्या हडपसर केंद्रामध्ये लसीचं परीक्षण, पाहणी आणि विश्लेषणासाठ स्पुटनिक-V निर्मितीसाठी परवानगी मागितली होती. तसा अर्ज सीरमकडून डीजीसीआयला करण्यात आला होता. पुण्यात असलेल्या हडपसर केंद्रात स्पुटनिक-व्ही निर्मितीसाठी सीरमनं मॉस्कोच्या गमलेया रिसर्च इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी सोबत करार केला आहे.

रशियाची कोरोना लस स्पुटनिक-व्ही कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या तुलनेत जास्त परिणामकारक असल्याचा दावा केला जात आहे. रशियाच्या गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूटने दावा केला आहे की स्पुटनिक-व्ही लस 91.6 टक्के प्रभावी आहे. कोविशिल्ड ही 80 टक्के तर कोवॅक्सिन ही 81 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतात रशियाची लस स्पुटनिक-व्हीची किंमत निश्चित केली असून जीएसटीसह एका डोसची किंमत 995 रुपये असेल. रशियन लस स्पुटनिक-व्हीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात आली. कोरोनाच्या संसर्गाविरूद्ध रशियन Sputnik V लस वापरण्यास अधिकृत मान्यता देणारा भारत जगातील 60 वा देश ठरला आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या, काही अब्ज किंवा 40 टक्के लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये या लसीच्या वापरास मंजुरी मिळाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत