Mamata Banerjee's younger brother Ashim Banerjee died due to CoronaMamata Banerjee's younger brother Ashim Banerjee died due to Corona
देश राजकारण

बंगालमध्ये लस प्रमाणपत्रावर लावणार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल सरकार आता राज्यात कोरोना लस प्रमाणपत्र देताना पंतप्रधान मोदींच्या ऐवजी ममता बॅनर्जी यांचा फोटो लावणार आहे. काही दिवसांपूर्वी छत्तीसगड सरकारने कोरोना लस घेणाऱ्यांना दिलेल्या प्रमाणपत्रात पंतप्रधानांऐवजी राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा फोटो वापरल्याने गदारोळ झाला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राज्य सरकारने खरेदी केलली लस टोचल्यानंतर प्रत्येक प्रमाणपत्रावर यापुढे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो येणार असल्याचे सांगितले जात आहे. याअगोदर कोविड प्रतिबंधक लस दिल्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो होता. मात्र, आता 18 ते 45 वर्ष वयोगटातील नागरिकांच्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो दिसणार आहे. कोलकाता येथील क्वेस्ट मॉल येथे राज्य सरकारने ड्राइव्ह-ई लसीकरण सुरू केले आहे. राज्य सरकारचे मंत्री फिरहाद हकीम म्हणाले, की आम्ही राज्यात दररोज 3 लाख लोकांचे लसीकरण करीत असून हे प्रमाण अधिक वाढवणार आहोत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सांगितले की, डिसेंबर 2021 पूर्वी देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करणार असल्याचं केंद्राचं वक्तव्य खोटं आहे. ते फक्त निराधार गोष्टी बोलत आहेत. केंद्र सरकार राज्यांना लस पुरवठा करत नाही. केंद्राने राज्यांसाठी लस विकत घ्यावी आणि सर्वांना ती विनामूल्य द्यावी.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत