Rekha Jare

यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा जरे यांची सुपारी घेवून हत्या, तिघांना अटक

महाराष्ट्र

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सुपारी घेवून हत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची हत्या करण्यात आली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

30 नोव्हेंबरला रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या झाली होती. रेखा जरे त्यांच्या कुटुंबियांसह संध्याकाळी पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची आई देखील होते. या दरम्यान, कारची काच एका दुचाकीला लागल्यामुळे वाद झाला. या वादातून रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिली होती. पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात ही हल्ल्याची घटना घडली होती. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोन दिवसांच्या आत तीन आरोपींना अटक केली आहे. रेखा जरे यांची हत्या सुपारी घेवून करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत