lpg gas cylinder price commercial cylinder price hike
देश

महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ

नवी दिल्ली : महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत 73.5 रुपये प्रति सिलेंडर इतकी वाढ केली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती या महिन्यात स्थिर आहेत. या वाढीनंतर दिल्लीमध्ये 19 किलोच्या कमर्शिअल गॅसच्या किंमती वाढून 1623 रुपये प्रति सिलेंडर झाल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती स्थिर आहेत. जुलैमध्ये तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25.50 प्रति सिलेंडरची वाढ केली होती. या वाढीनंतर दिल्लीमध्ये विना सब्सिडीच्या गॅस सिलेंडरची किंमत 834.50 रुपये आहे. हीच किंमत या महिन्यात असणार आहे. कोलकातामध्ये 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचे दर 861 रुपये, मुंबईमध्ये दर 834.50 रुपये आणि चेन्नईमध्ये दर 850.50 रुपये प्रति सिलेंडर आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत