lpg cylinder refill becomes easier chose distributor of your choice
देश

दिलासादायक! LPG सिलिंडरच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या आजची किंमत…

नवी दिल्ली : महागाईने त्रस्त असलेल्या लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जारी केले आहेत. 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त झाला आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दर कपातीनंतर आता दिल्लीत 19 किलोचा सिलेंडर 2354 रुपयांऐवजी 2219 रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात त्याची किंमत आता 2454 रुपयांवरून 2322 रुपयांवर आली आहे. मुंबईत आता 2306 रुपयांऐवजी 2171.50 रुपयांना मिळणार आहे, तर चेन्नईमध्ये ग्राहकांना 2507 रुपयांऐवजी 2373 रुपये मोजावे लागणार आहेत.

यापूर्वी, गेल्या दोन महिन्यांत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत अनेक वेळा वाढ झाली होती. मार्चमध्ये दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 2,012 रुपये होती. 1 एप्रिल रोजी त्याची किंमत 2,253 रुपये करण्यात आली. त्यानंतर 1 मे रोजी त्याची किंमत 102 रुपयांनी वाढवण्यात आली. यानंतर व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2,354 रुपये झाली.

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही
पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र मे महिन्यातच त्याची किंमत दोनदा वाढवण्यात आली. 7 मे रोजी कंपन्यांनी 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढवली होती. त्यानंतर 19 मे रोजी 3.50 रुपयांच्या वाढीसह अनेक शहरांमध्ये त्याची किंमत 1000 रुपयांच्या पुढे गेली. यानंतर दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1003 रुपयांवर पोहोचली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत