Speeding BMW Collided With Container On Purvanchal Expressway

BMW चा वेग दाखवण्यासाठी फेसबुक लाइव्ह, काही क्षणातच भीषण अपघात, चौघांचा जागीच भयंकर मृत्यू

देश

बिहार : पूर्वांचल एक्स्प्रेसवर भरधाव वेगाने जाणारी बीएमडब्ल्यू कार आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. हलियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच हा अपघात झाला असून, काही दिवसांपूर्वी रस्ता खचल्याने येथे मोठा खड्डा तयार झाला होता. त्यामुळे वाहतूक वळवण्यात आलेली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

डॉ. आनंद कुमार हे त्यांचा चुलत मेहुणा दीपक आनंद आणि इतर दोन मित्रांसह शुक्रवारी यूपीमधील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर अत्यंत वेगवान बीएमडब्ल्यू चालवत होते. हळूहळू कारचा वेग अनियंत्रित झाला आणि ही कार सुलतानपूरमध्ये समोरून येणाऱ्या कंटेनरला धडकली. अपघात इतका भीषण होता की चौघांचा जागीच मृत्यू झाला. कारचा क्रमांक UK 01C 0009 असून ती सुलतानपूर बाजूने जात होती. त्याच रस्त्यावर समोरून येणाऱ्या कंटेनरने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचे इंजिन आणि चारही जण दूरवर विखुरले गेले आणि बीएमडब्ल्यू कार कंटेनरखाली आली.

अपघातापूर्वी फेसबुक लाइव्ह
अपघातापूर्वी बीएमडब्ल्यू मधील एकजण फेसबुक लाइव्हवर होता. यादरम्यान त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओही फेसबुकवर लाइव्ह होत होता. दरम्यान, FB वर लाइव्ह असताना बिहार येथील अभियंता दीपक आनंद म्हणाले कि, चौघेही मरणार. दरम्यान, बीएमडब्ल्यूचा वेग दाखवण्यासाठी कॅमेरा त्याच्या स्पीडोमीटरवर केंद्रित होता. या व्हिडीओमध्ये पुढे जे दिसते ते हृदय पिळवटून टाकणारे आहे. १.२५ कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू ६२-६३ किमी प्रतितास वेगाने धावत होती. नंतर तिचा वेग वाढतो, वाढवत तो 230 किमी प्रतितास पर्यंत जातो. एकजण अजून वेग वाढवण्यास सांगतो. फेसबुकचा संपूर्ण व्हिडिओ अपघातापर्यंत पोहोचत नाही, पण त्यानंतर काही क्षणातच त्यांच्या कारचा अपघात झाला.

ही टक्कर इतकी भीषण होती की कारमध्ये बसलेले चार जण आणि बीएमडब्ल्यूचे इंजिन दूरवर पडले. चौघांचा जागीच मृत्यू झाला. एका व्यक्तीचे डोके धडापासून वेगळे झाले. मृताचे डोके व हात 20-30 मीटर अंतरावर पडले. तसेच कारचा चक्काचूर झाला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत