मुंबई : अमूलने फुल क्रीम दूध आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. अमूलने दुधाच्या दरात केलेली ही तिसरी वाढ आहे. कंपनीने मार्चमध्ये आणि ऑगस्टमध्ये देखील त्यांच्या दुधाच्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या होत्या.
गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने शनिवारी अमूल ब्रँड अंतर्गत आपल्या उत्पादनांची विक्री करणाऱ्या गुजरात वगळता सर्व राज्यांमध्ये फुल क्रीम दूध आणि म्हशीच्या दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवले आहेत. फुल क्रीम दुधाचे दर प्रतिलिटर ६१ रुपयांवरून ६३ रुपये झाले आहेत.