हरियाणा : हरियाणा सरकारने शुक्रवारी (17 जून) केंद्राच्या अग्निपथ भरती योजनेला होणाऱ्या विरोध प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मोबाइल इंटरनेट आणि एसएमएस सेवा निलंबित करण्याचे आदेश दिले. आदेशानुसार, संभाव्य कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता हे निर्बंध पुढील 24 तासांसाठी तात्काळ प्रभावाने लागू केले जातील.
हरियाणा सरकारने नवीन सैन्य भरती धोरणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य कायदा आणि सुव्यवस्था स्थिती लक्षात घेऊन मोबाइल इंटरनेट सेवा, सर्व एसएमएस सेवा निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. आदेश पुढील 24 तासांसाठी तात्काळ प्रभावाने लागू म्हणजेच उद्या 4:30 वाजेपर्यंत लागू राहतील. फेसबुक, ट्विटर, whatsapp या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममार्फत अनेक अफवा पसरवल्या जात असून यामुळे हिंसा उफाळून जीवितहानी तसेच सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेला मोठी हानी होऊ शकते. सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि बातम्या पसरवल्या जात असून हे प्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.





