मुंबई : राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर देखील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, येत्या ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातही पावसाला पोषक वातावरण होत आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानंतरच्या 3 दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस तर मुंबई ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे.
17 Jun; येत्या ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.
पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता.
त्यानंतरच्या 3 दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता.
मुंबई ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे.
– IMD pic.twitter.com/yYycL1q5vw— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 17, 2022
11 जून पर्यंत बहुतांशी कोकण, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भागात मान्सून दाखल झाला. 13 जून रोजी मान्सूनने संपूर्ण कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागापर्यंत महाराष्ट्र व्यापला. बुधवारी (१५ जून) दक्षिण मराठवाड्यात, तर गुरुवारी (१६ जून) संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापत गोंदियापर्यंत धाव घेत विदर्भाच्या बहुतांश भागात मान्सून पोहोचला आहे. येत्या रविवारपर्यंत मान्सून संपूर्ण विदर्भ, आंध्र प्रदेशसह बंगालचा उपसागर व्यापून छत्तीसगड, ओडिशाच्या आणखी काही भागासह झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहार, उत्तर प्रदेशमध्ये दाखल होण्यास पोषक हवामान आहे. तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशच्या आणखी काही भागातही मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
.




