देश

दहशतवादी संघटनेकडून लाल किल्ल्यावर खालिस्तानी झेंडा फडकावणाऱ्याला बक्षीसाची घोषणा, दिल्ली सुरक्षा व्यवस्थेत वाढ

इंटेलिजन्स एजन्सी आयबीला माहिती मिळाली आहे की, खालिस्तान आंदोलनाला पुन्हा सक्रिय करण्यासाठी 14, 15 आणि 16 ऑगस्टला लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर केली जात आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

खालिस्तानची मागणी करणाऱ्या दहशतवादी संघटना ‘शीख फॉर जस्टिस’ने स्वातंत्र दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर खालिस्तानी झेंडा फडकावणाऱ्याला बक्षीसाची घोषणा केली आहे. बक्षीसाची रक्कम 125,000 डॉलर एवढी ठेवण्यात आली आहे. या इशाऱ्यानंतर दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

अमेरिकेत राहत असलेल्या अॅडवोकेट गुरुपतवंत सिंह पन्नू जो SFJ फोरमचा लीगल ॲडव्हायझर सुद्धा आहे. त्याने युट्यूबवर “शीख फॉर जस्टीस” या नावाने व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खालिस्तानचा झेंडा फडकवण्याचं आवाहन केले आहे.

15 ऑगस्टला दिल्लीत होणाऱ्या मुख्य समारंभावर कोरोनाचं देखील सावट आहे. यावेळी केवळ ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि पंतप्रधानांचं भाषण होणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत