lady did rape with minor boy pocso act
क्राईम देश

क्रूरतेचा कळस! जोडप्याकडून 12 वर्षाच्या मुलावर भयंकर अत्याचार, ‘असा’ झाला खुलासा…

राजस्थान : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये क्रौर्याची परिसीमा ओलांडणारी घटना समोर आली आहे. येथील एका दाम्पत्याने एका 12 वर्षाच्या मुलाला बिहारमधून जयपूरला आणले. तिथे त्याला दिवसभर बांगड्या बनवण्यास सांगितले जायचे आणि त्यानंतर त्याला जेवणात पाणी आणि बिस्किटे दिली जायची. एवढेच नाही तर मुलाने जेवणाची मागणी केल्यास त्याला मारहाण करण्यात यायची. त्यातच पती पत्नीसमोरच त्या मुलासोबत गैरवर्तन देखील करायचा.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील दरभंगा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मुलाला ओळखीतल्या जोडप्यासोबत जयपूरला पाठवले. हा मुलगा मोहम्मद रियाज आणि रुही परवीन यांच्यासोबत राहत होता, जे जयपूरच्या शास्त्री नगर येथील मक्का मस्जिद परिसरात राहत होते. हे दाम्पत्य सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत मुलाकडून बांगड्या बनवून घ्यायचे. हा मुलगा फोनवर त्याच्या घरच्यांशी बोलायचा तेव्हा त्याला तो ठीक आहे असे सांगण्याची बळजबरी केली जायची.

पत्नीसमोर मुलावर अत्याचार करायचा
पीडित मुलाने पोलिसांना सांगितले की, रियाज दारूच्या नशेत पत्नी रुहीसमोर त्याच्यासोबत गैरवर्तन करायचा. दरम्यान, एकदा मुलाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याच्या पायाच्या तळव्यांना चटके दिले. तो आजारी असताना आरोपी दाम्पत्य त्याला औषध देण्याऐवजी मारहाण करायचे. यादरम्यान मुलाच्या रडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून आरोपी स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी वाजवायचा.

असा झाला खुलासा
मंगळवारी रुहीने या मुलाला छताची साफ-सफाई करण्यास सांगितले. त्याच्या पायाला इजा झालेली असल्यामुळे त्याला चालताना त्रास होत होता, म्हणून तो रांगत – रांगत शेजारच्या गच्चीवर गेला आणि तिथून खाली रस्त्यावर आला. आजूबाजूच्या लोकांनी नवीन मुलाला असे रांगताना पाहिले तेव्हा ते त्याच्याकडे गेले. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. त्यानंतर त्यांनी पोलिस आणि चाइल्ड हेल्पलाइनला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत आरोपी रुहीला अटक केली, तर रियाजचा पोलिस अद्याप शोध घेत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत