क्राईम महाराष्ट्र

धक्कादायक! अल्पवयीन मुलाने आईच्या मदतीने केली वडिलांची हत्या

अकोला : अकोला शहरात ३० एप्रिल २०२५ रोजी रमेश सातरोटे (वय ५२) यांच्या मृत्यूचा एक धक्कादायक प्रकार समोर आला. सुरुवातीला रमेश यांचा मृत्यू अपघातात झाल्याचा बनाव आई आणि अल्पवयीन मुलाने केला होता, मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार हत्येचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, २० एप्रिल २०२५ रोजी रात्री सुमारे १० वाजता रमेश दारूच्या नशेत घरी परतले असता त्यांनी पत्नीला मारहाण केली. यावेळी रोजच्या त्याच्या वर्तनाने मुलाचा संयम सुटला आणि त्याने रागाच्या भरात घरातील फावडा घेऊन वडिलांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर आईनेही जोरदार लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, ज्यामुळे रमेश गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत्यू नंतर आई-मुलाने हा प्रकार अपघात असल्याचा बनाव करत तातडीने अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतल्यावर सत्य समोर आले.

पत्नीने सुरुवातीला शवविच्छेदनास विरोध दर्शवला होता. तेव्हा पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरता नेला. शवविच्छेदन अहवालातून शरीरावर गंभीर जखमा आणि मारहाणीचे पुरावे आढळले. दरम्यान, वैद्यकीय अहवाल व पोलिस तपासाअंती सदर घटना ही आकस्मिक मृत्यू नसून खून झाल्याचे 26 दिवसांनंतर समोर आले. पोलिसांना सुरुवातीपासूनच मृत रमेशच्या पत्नीवर संशय होता. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी रमेशची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी खोलात जाऊन तपास करून सबळ पुरावे प्राप्त केले. मृतकाची पत्नी शीला तसेच तिचा लहान मुलगा यांच्याविरुध्द पुरावे मिळाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. मारेकरी मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला बाल सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. पत्नी शिला हिला अकोला जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून, पोलिस तिची कोठडी मागणार आहेत.

जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन लेव्हारकर आणि त्यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना अटक केली असून, बीएनएस कलम १०३ (१), ३(५) व २३८ अन्वये हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस येताच संपूर्ण अकोला शहरात मोठा खळबळ उडाली. सध्या या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत