Shiv Sena follows up on the growing problem of traffic congestion at Pari Chowk
पुणे महाराष्ट्र

पुणे : नऱ्हे येथील पारी चौकातील वाहतूक कोंडीच्या वाढत्या समस्येचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून पाठपुरावा, उपाययोजनांची अपेक्षा…

पुणे : धायरी (नऱ्हे) येथील पारी चौक परिसरात दररोज होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख महेश राजाराम पोकळे यांनी वाहतूक विभागाकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या निवेदनात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, पारी चौकाजवळील MNGL कंपनीचा CNG पंप हे वाहतूक कोंडीचे मुख्य केंद्र बनले आहे. अरुंद रस्ता आणि पंपावर CNG भरण्यासाठी रांगेत लागणारी वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने, परिसरातील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होतो आहे. परिणामी, शालेय वाहने, ऑफिसकर्मी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गोंधळामुळे अपघाताची शक्यता सुद्धा वाढली आहे.

महेश पोकळे यांनी याबाबत पुढाकार घेऊन वाहतूक विभागाला खालील उपाययोजनांची विनंती केली आहे:

  • पंपाजवळील वाहतूक प्रवाहाची तपासणी आणि व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा नेमणे
  • वाहने रस्त्यावर उभी राहू नयेत यासाठी कठोर नियमावली आणि अंमलबजावणी
  • पर्यायी मार्ग अथवा वाहनांच्या पार्किंगसाठी जागेची उपलब्धता शोधणे
  • स्थानिक नागरिक व वाहतूक विभाग यांच्यात समन्वय बैठक आयोजित करणे

विशेष म्हणजे, या निवेदनासोबत नागरिकांच्या सह्यांचे समर्थनपत्र देखील जोडण्यात आले असून, यावर सिंहगड रोड वाहतूक विभागाचे ठाणे अंमलदार यांनी अधिकृत स्वाक्षरी करत निवेदन स्वीकारले आहे.

 

स्थानिक जनतेचा या मागणीला मोठा पाठिंबा असून, आता प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे. येत्या काही दिवसांत वाहतूक सुधारण्यासाठी प्रशासन यादृष्टीने काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत