मुंबई : १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीची आई पीडीतेला गर्भपातासाठी रुग्णालयात घेऊन आली असता ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सत्र न्यायालयात आणि बाल न्याय मंडळासमोर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पीडितेच्या मित्राला अटक केली होती. मात्र, डीएनए चाचणीत वेगळेच सत्य बाहेर आले.
वांद्रे येथील सरकारी रुग्णालयानं दिलेल्या माहितीनुसार, एक महिला तिच्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यासाठी आली होती. त्यावेळी मुलगी आठ आठवड्यांची गर्भवती होती. सरकारी रुग्णालयाच्या प्रशासनाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. बलात्कार प्रकरणात पोलिसांनी पीडितेच्या मित्राला अटक केली होती. मात्र, पीडीतेच्या डीएनए चाचणीचे अहवाल समोर आले आणि या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.
पोलिसांनी पीडित मुलीची अधिक चौकशी केल्यानंतर १९ वर्षांच्या तरुणाने लग्नाचे अमिष दाखवत तिच्यासोबत संबंध ठेवले असल्याचं तिने पोलिसांनी सांगितले. अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं. त्यानंतर चौकशीदरम्यान, त्याने गुन्हा कबुलही केला. एपीआय राजू चव्हाण आणि त्यांचे साथीदार तरुणाविरोधात आरोपपत्र दाखल करत असतानाच त्यांना तरुणीचा डीएनए चाचणीचा रिपोर्ट मिळाला. रिपोर्ट येताच पोलिसही चक्रावून गेले.
डीएनए चाचणीचे आणि आरोपीचे नमुने जुळत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर महिला पोलिसांनी पीडित मुलीला विश्वासात घेतले असते तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितलं. पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार, मुलीच्या १७ वर्षीय भावाला तिच्या आणि प्रियकरासोबतच्या संबंधांबाबत समजले. त्यानंतर त्याने तिला धमकवायला सुरुवात केली. आईला तुझ्या प्रियकराबद्दल सगळं सांगेन, अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तरुणीच्या भावाला ताब्यात घेतलं आहे.




