अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणात रोज नवनवीन खुलासे, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर १५ कोटीचा घपला केल्याचा आरोप केला आहे व त्याविषयी तक्रारही नोंदवली आहे.
अशातच रिया चक्रवर्तीचा एक जुना विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तिने अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तिला खरेदी करायच्या आहेत. या व्हिडिओमध्ये रिया म्हणत आहे, मला खासगी बेट खरेदी करायचे आहे, खासगी जेट पाहिजे आहे आणि हॉटेल खरेदी करायचे आहे. मला हॉटेल आवडतात. ती यामध्ये आपल्या इच्छा सांगून हसू लागल्याचे दिसत आहे. हा तिचा जुना व्हिडिओ असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.




