India-china

मॉस्को येथे भारत आणि चीन शिष्टमंडळांची २ तास २० मिनिटे चर्चा

ग्लोबल देश

रशियाची राजधानी मॉस्को येथे शांघाय को-ऑपरेशनच्या बैठकीच्या निमित्ताने भारत आणि चीनच्या शिष्टमंडळांची एक बैठक झाली. दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी आपापल्या शिष्टमंडळांचे नेतृत्व केले. ही बैठक २ तास २० मिनिटे सुरू होती. बैठकीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव दूर करण्यावर चर्चा झाली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव चर्चेच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करणे शक्य आहे; यावर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांचे एकमत झाल्यानंतर चर्चा झाली. तणाव चीनच्या सैन्यामुळे वाढला आहे, अशा परिस्थितीत चिनी सैन्याने छावण्यांमध्ये जाऊन तणावापूर्वीची स्थिती निर्माण करावी. यातून तणाव दूर होईल आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता निर्माण होईल; अशी भूमिका भारतीय शिष्टमंडळाने मांडली. चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा मान राखावा असे भारताने ठणकावून सांगितले.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन करत राहायचे आणि चर्चा सुरू ठेवायची हा प्रकार भारत खपवून घेणार नसल्याचे चीनला स्पष्ट करण्यात आले. राजनाथ यांच्या दौऱ्यात भारत-चीन चर्चेचा कार्यक्रम आधी ठरला नव्हता. त्यामुळे चीनला चर्चेसाठी वेळ देण्याचा निर्णय बऱ्याच वेळाने झाला. अखेर शुक्रवारी रात्री दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांनी चर्चा करावी असे ठरले आणि चर्चा पार पडली.

चर्चा झाली तरी सैन्याने चिनी हालचालींवरचे लक्ष तसूभरही हटू दिलेले नाही. लष्करप्रमुख नरवणे आणि हवाईदल प्रमुख भदौरिया आपापल्या दलांच्या तयारीचा आढावा घेत आहेत. दोन्ही प्रमुख आपल्या दौऱ्याचा अहवाल दिल्लीत परतल्यावर संरक्षणमंत्र्यांना सादर करणार आहेत. चीनने आगळीक केल्यास चिनी सैन्याला रोखण्याच्या स्पष्ट सूचना सैनिकांना देण्यात आल्या आहेत. लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्या ठरल्याप्रमाणे चर्चा सुरू आहेत. या चर्चांतून अद्याप तोडगा निघालेला नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत