corona vaccine

2021 च्या मध्यापर्यंत जगभरात कोरोनावरची लस दिली जाऊ शकते- WHO

कोरोना ग्लोबल

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की, 2021 च्या मध्यापर्यंत जगभरात कोरोनाची लस दिली जाऊ शकते. डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

स्वामीनाथन म्हणाल्या कि, ही लस 2021 च्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या तिमाहीत जगभरातील सर्व देशांमध्ये पोहोचू शकेल. हे या आधारे निश्चित केले आहे की जगभरातील तिसऱ्या टप्प्यात सुरू असलेल्या कोरोना लसींच्या चाचण्या या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होतील असे दिसत नाही. चाचणी पूर्ण झाल्यानंतरच लस मोठ्या प्रमाणात तयार केली जाऊ शकते. त्यामुळे 2021 च्या मध्यानंतर हि लस सर्वांसाठी उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत