filipino snake man who claimed he was immune venom dies after cobra bit him

जगातील सर्वात विषारी कोब्रा सापाला किस करणं पडलं महागात, कोब्राने जीभेवर दंश मारला आणि…

ग्लोबल

फिलिपिन्स : फिलिपिन्सच्या एका सापाच्या एक्सपर्टचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. पंगासिनान प्रांतातील या सापाच्या एक्सपर्टने गर्दी समोर कोब्रा सापाला किस करण्याचा प्रयत्न केला होता. या एक्सपर्टने दावा केला होता सापांच्या विषाने त्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, कारण त्याच्यामध्ये त्याविरुद्ध लढण्यासाठी इम्युनिटी आहे, परंतु, त्याचा हा दावा चुकीचा ठरला आणि काही मिनिटातच त्याचा मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

‘द सन’च्या रिपोर्टनुसार, ६२ वर्षीय बर्नाडो अल्वारेज सापांचे एक्सपर्ट होते. त्यांनी जगातील सर्वात जास्त विषारी मानल्या जाणाऱ्या कोब्रा सापाला पकडले. त्यानंतर त्यांनी दावा केला की, ते सापांच्या विषाने ‘इम्यून’ आहेत आणि सर्पदंशाने त्यांना काहीही होणार नाही. त्यानंतर त्यांनी कोब्राला उचलले आणि त्याला किस करण्याचा प्रयत्न केला. ते कोब्राला आपल्या तोंडाजवळ घेऊन गेले आणि त्याचवेळी कोब्राने त्यांच्या जीभेवर दंश मारला. त्यानंतर अल्वारेज जागेवरच कोसळले आणि ओरडू लागले. परंतु, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. हेल्थ ऑफिसर डॉ. ऐना डी गजमन यांच्या म्हणण्यानुसार सापाच्या विषामुळे अल्वारेज यांना लखवा मारला होता. त्यामुळे ते श्वास घेऊ शकत नव्हते आणि त्यामुळे त्यांचे हृदय बंद पडले.

संतापलेल्या लोकांनी नंतर या कोब्रा सापाला मारून टाकलं. ज्या कोब्राने एक्सपर्टला दंश मारला तो उत्तर फिलिप कोब्रा जगातील सर्वात विषारी कोब्रा मानला जातो. उत्तर फिलीप कोब्राची लांबी सरासरी १ मीटर असते १.६ मीटरपर्यंत हे साप लांब असू शकतात. हे साप ३ मीटर अंतरापर्यंत विषाने निशाणा साधू शकतात. यांच्या दंशामुळे डोकेदुखी, चक्कर, उलटी, पोटात वेदना, डायरिया आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. या सापाने दंश केल्यावर ३० मिनिटांतच जीव जाऊ शकतो.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत